शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

आपल्या प्रगतिचे सिक्स सिग्मा ( Six Sigma) टेक्नीक




आपण आयुष्यात भरघोस प्रगती करवी असे प्रत्येकालाच वाटत असते! ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात आपले नांव व्हावे, समाजात आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, आपला गौरव व्हावा, लोकांना आपल्याविषयी आदर वाटावा, आपल्याला सौजन्यपूर्वक वागणुक मिळावी अशी सुप्त इच्छा जवळ जवळ प्रत्येकाचीच असते. अर्थात प्रत्येकाच्या प्रागती मोजण्याच्या फुटपट्या वेगवेगळ्या असु शकतात. कोणाला उच्च शीक्षण घेणे, पी.एच्‍. डी. करुन डॉक्टरेट मिळविणे यात प्रगती दीसते. कोणाला आयुष्यात भरपूर पैसा मिळविणे, घर, दार, बंगला, गाडी, भरपुर बँक बॅलन्स असणे म्हणजे प्रगती वाटते. नोकरी करणार्‍या अनेक जणांना नोकरीत प्रमोशन मिळणे, मॅनेजर, जनरल मॅनेजर, डायरेक्टर किंवा मॅनेजींग डायरेक्टर होणे म्हणजे प्रागती झाली असे वाटते. तर कांही जणांना आपल्या मुलांच्या प्रगतीमधे, त्यांच्या करीअरमधे आपली प्रगती दिसत असते.
पण फारच थोड्या लोकांना मनासारखी प्रगती साधता येते. बहुतेकांना मनासारखी प्रगती साधता येत नाही. त्यांच्या प्रगतीत काही ना काही तरी अडथळे, अडचणी किंवा समस्या येत असतात. मग दैवाला किंवा नशिबाला दोष देण्यापलिकडे त्यांच्या हातात फारसे कांही उरत नाही. आपल्या प्रगतिच्या आड येणारे सहा महत्वाचे अडथळे कोणते ते खाली दिले आहे. हे सर्व अडथळे मानसीक स्वरुपाचे आहेत आणि प्रत्येक माणसाच्या मनात ते असतातच. हे अडथळे आहेत
1)      उद्या ( Tomorrow  )
2)      उध्धटपणा ( Arrogance )
3)      आळस ( Laziness )
4)      वाईट सवयी ( Bad Habits )
5)      भिती ( Fear )
6)      कुचेष्टा ( Cynicism )
या वरील विवेचन पुढील पोस्टमध्ये.
अडथळा क्र. 1 उद्या ( Tomorrow  ):-
उद्या हा एक अत्यंत घातक अणि विध्वंसक शब्द आहे. या शब्दाने जेव्हडी माणसांची बर्बादी झाली आहे व अनेकांची आयुष्ये उध्वस्थ झाली आहेत तेव्हडी इतर दुसर्‍या कोणत्याही शब्दाने झाली नसतील! मी उद्यापासून नियमीतपणे अभ्यासाला सुरवात करणार आहे. मी उद्यापासून नियमीतपणे व्यायामाला सुरवात करणार आहे. मी उद्यापसुन नक्की सिगारेट किंवा दारू सोडणार आहे. मी उद्यापासून व्यवस्थीत हिशोब ठेवायला सुरवात करणार आहे. अशा पध्धतिने नेहमी उद्याची पूजा केली जाते. पण या उद्याला काही टाइम लिमीट नसते. हा उद्या म्हणजे पुढचा दिवस, पुढचा आठवडा, पुढचा महिना, पुढचे वर्ष किंवा 20 वर्षांनंतरचा पिरीयड पण असु शकतो. कित्येक जणांच्या आयुष्यांत तर हा उद्याकधी उगवतच नाही. त्यामुळे उद्यावर ढकललेली कामे तशीच राहुन जातात. जे लोक जो कल करे वो आज कर, जो आज करे वो अब हे सुत्र वापरतात ते या उद्या वर मात करण्यात यशस्वी होतात व वेगाने प्रगती करतात. पण बहुतेक लोक जो आज करे वो कल कर, जो कल करे वो परसो! इतनी जल्दी क्या है यांरो हमे जिना है बरसो! या सुत्राचा उपयोग करुन स्वतःला उद्याच्या गर्तेत अडकवून घेत असतात. त्यामुळे त्यांची प्रागती खुंटते, मंदगतिने होते किंवा होतच नाही. यशस्वी माणसाच्या शब्दकोशात उद्याहा शब्द नसतोच मुळी. हा सब्द फक्त अयशस्वी माणसांच्या शब्दकोशात सापडतो. त्यामुळे प्रगती करायची असेल तर प्रत्येकाने या उद्याच्या बंधनातुन स्वतःला मुक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने, उद्या कशाला, आज कां नको? नंतर कशाला, आत्ता कां नको? असे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्यांना आज नको उद्या बघु. उद्या नको पर्वा बघु. पर्वा नको नंतर बघु. असे म्हणायची सवय आहे ते स्वतःला या उद्याच्या गर्तेत अडकवुन घेत आहेत हे त्यांनी लक्षांत ठेवावे.

अडथळा क्र. 2 - उध्धटपणा ( Arrogance ):-
आपल्यातील दोष, उणिवा किंवा कमीपणा झाकण्यासाठी बर्‍याच वेळा उध्धटपणाचा आश्रय घेण्यात येतो. कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तींकडुन, कुटुंब प्रामुखांकडुन किंवा बॉसेसकडुन अनेकवळा याचा उपयोग केला जतो. पण याच उध्धटपणाचे रुपांतर पुढे मी पणामधे ( Ego ) व गर्विष्ठपणामधे ( Over Confidence )  केव्हा होते ते कळतसुध्धा नाही. मी म्हणजे सर्वोत्तम माणुस! मी म्हणजे अत्यंत हुषार! मला सर्व कांही येते, मला सर्व कांही समजते! मी म्हणजे ग्रेट!  अशा प्रकारच्या मानसिकेतुन उध्धटपणाला सुरवात होते.त्याला काय कळते? त्याला काय समजते? त्याला किती अक्कल आहे माहित्ये! त्याची माझ्याशी बोलायची तरी लायकी आहे कां? या भावनांमधुन मग मी पणा आणि गर्विष्ठपणा फुलत जातो. पण शेवटी गार्वाचे घर खाली असते हे प्रत्येकाने लक्षांत ठेवावे. अनेक थोर लोक कमालिचे निगर्वी होते. आपणही सामान्यच आहोतही गोष्ट ते कधी विसरले नाहीत. त्यामुळे सामान्य माणसांसारखा व्यवहार करताना; बस मधुन, ट्रेनमधुन सामान्य लोकांसारखा प्रवास  करताना त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. उलट अनेक सामान्यलोकांकडुन ते अनेक असामान्यगोष्टी शीकले. म्हणुनच ते थोर पुरुष किंवा स्त्री होऊ शकले. याविषयी सर ऍयझॅक न्युटन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, मला ईतरांपेक्षा दुरचे दीसते कारण मी एका उंच राक्षसाच्या खांद्यावर उभा आहे म्हणून.” थोडक्यात ते आपल्या दुर दिसणार्‍या क्षमतेचे क्रेडीट त्या उंच राक्षसाला देतात, स्वतःला नाही. याला म्हणतात विनय व निगर्वीपणा

अडथळा क्र.3- आळस ( Laziness ):-
आळस हा प्रत्येकाच्या अंगातच मुरलेला असतो. कोणत्याही गोष्टिची किंवा दिवसाची सुरवात करताना ती चटकन करावी असे कोणालाच वाटत नसते.जाऊ दे उद्या बघु ! आत्ता नको नंतर बघु ! बघुया ऐनवेळी काय होते ते ! आत्ता तर आरम करू ! ही मनोवृत्ती आळशीपणा दाखवते. आपला आळशीपणा झाकण्यासाठी मला वेळ नाही.किंवा मला आत्ता वेळ नाही या वाक्याचा छान उपयोग करता येतो. फ्रान्सचा सम्राट नेपोलीयन याने थोडा आळस दाखवला. तो युध्धभुमीवर पाच मिनिटे उशीरा पोचला. त्यामुळे तो वॉटर्लुचे युध्ध हरला व त्याची राजवटच संपुष्टात आली.

अडथळा क्र.4- वाईट सवयी ( Bad Habits ):-
पुण्यातील माझ्या ओळखिच्या एका तरूण सॉफ्टवेअर इंजिनीयरला एका वर्षी 70 हजार रुपये एव्हडे घसघशीत इन्क्रिमेन्ट मिळाले. या पैशांचे तु काय करणार असे मी त्याला विचारले तर त्याने दिलेले उत्तर ऐकुन मी सर्दच झालो. तो म्हणाला, इतके दीवस मी ऑर्डीनरी बीयर बार मधे जाऊन देशी व्हिस्की पीत होतो. आता मी फाइव्ह स्टार हॉटेलमधे जाऊन स्कॉच व्हिस्की पीणार! सिगारेट, दारू, घुटका, तंबाखु ही व्यसने वाईटच. पण या व्यतिरिक्त इतरांना अनेक वाईट- वाईट सवयी असतात. कोणाला पचा-पचा थुंकायची सवय असते. तर कोणाला स्त्रियांकडे बघून अश्लील कॉमेन्टस करायची सवय असते. त्याचा इतरांना त्रास होत असतो पण त्याची त्यांना पर्वा नसते. उलट आपल्या वाईट व्यसनांना किंवा वाईट सवयींना प्रातिष्ठा किंवा ग्लॅमर मिळवुन देण्यासाठी त्यांना प्रागती हवी असते. मी रोज दोन पाकिटे सिगरेट्स ओढतो, त्या सुध्धा इम्पोर्टेड”  असे अभिमानाने सांगणारे लोक मला भेटले आहेत. मी ऍडजेस्ट होणार नाही, इतरांनी पाहिजे तर ऍडजेस्ट व्हावे असा ताठा त्यांच्यात असतो. या वाईट सवयिंमुळे मागे पडलेले अनेक जण मला माहीत आहेत. वाईट व्यसनांमुळे प्रकृती ही खराब होतच असते. प्रगतिच्या ऐन मोक्याच्या वेळी, प्रकृतिने दगा दिल्यामुळे हातात आलेली संधी कायमची नीसटून गेली असे पुष्कळ जणांच्या बाबतीत घडलेले मी बघीतले आहे.

अडथळा क्र. पांच- भिती ( Fear ):-
अनेकांच्या मनात कसली ना कसली तरी भिती असते. कित्येकजण तर भयगंडाने पछाडलेले असतात. माणूस जेव्हडा सुरक्षीत वातावरणात जगतो तेव्हडा घाबरट बनत जातो. त्यांना फेल्युअरची किंवा अपयशाची भिती वाटत असते. आपण फेल झालो तर लोक आपली निंदा नालस्ती करतील, आपली कुचेष्टा करतील, आपल्याला मुर्ख-बेअकली समजतील, आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, आपली बेइज्जत होईल अशी भिती त्यांना वाटत असते. एखादी योजना यशस्वी झाली तर त्यापसुन काय फायदा हाईल याचा विचार न करता ती जर फेल झाली तर त्यापसुन काय नुकसान किंवा त्रास होईल याचा विचारच ते सतत करत असतात. भित्यापाठी ब्रम्हराक्षसही म्हण त्यांच्या बाबतीत अगदी खरी ठरते. त्यामुळे अनेक चांगल्या योजना, इच्छा असुनही, भितिपोटी अंमलात आणायचे धाडस त्यांना होत नाही. यश-अपयश, सक्सेस-फेल्युअर या एकाच नण्याच्या दोन बाजु आहेत. ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दीवस हे चक्र अव्याहत चालू असते तसेच हे चक्र पण चालु असते. यश मिळविण्यासाठी अपयश पचविण्याची सवय असावी लागते. जे अपयश पचवु शकतात त्यांनाच यश मीळत असते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात ते उगीच नाही. इलेक्ट्रीक बल्ब शोधुन काढण्याचे श्रेय थॉमस अल्वा एडीसनला जाते. पण तो 999 वेळा फेल झाला होता. त्याचा प्रयोग 999 वेळा अयशस्वी झाला होता. पण त्याने प्रायत्न करणे सोडुन दिले नाही. त्याने जर निराश होऊन प्रयत्न करणे सोडुन दिले असते तर इलेक्ट्रीक बल्ब मिळायला अजुन कित्येक वर्षे वाट बघावी लागली असती. आपल्या 999 वेळा फेल गेल्याचे त्याने मजेदार विधान केले आहे. तो म्हणतो कोणत्या 999 मार्गांनी इलेक्ट्रीक बल्ब तयार करता येत नाही हे मला समजले. आपण आपल्य फेल्युअरकडे सुध्धा सकारात्मक पणे बधीतले पाहिजे.

अडथळा क्र. सहा - कुचेष्टा ( Cynicism ):-

कुचेष्टा हा एक वाईट प्राकार आहे. लोक चेष्टा करत असतात पण त्याची कुचेष्टा केव्हा होते समजत नसते. अनेकांना चेष्टा व कुचेष्टा यातला फरक समजत नसतो. पंन्नाशितील एका गृहस्थांना मी गुंतनणुकिची एक फायदेशीर योजना समाजाऊन सांगायला गेलो होतो. पण जेव्हा त्यांनी, मी पैशांची गुंतनणुक का करायची? मला जास्त पैशांची काय जरुरी आहे? मला हे पैसे थोडेच स्वर्गात घेऊन जायचे आहेत? माझ्या मुला बाळांसाठी मी कशाला संपत्ती ठेऊन जाऊ? त्यांचे ते बघून घेतील. मी नातवंडांसाठी कशाला पैसे गुंतवायचे? त्यांचे आई वडील बघुन घेतील. अशी कुचेष्टापुर्ण मुक्ताफळे उधळायला सुरुवात केल्यावर मी तेथुन काढता पाय घेतला आणि ते पण एका चांगल्या योजनेला मुकले. कुचेष्टा हा नकारात्मक टिकेचा एक भयंकर प्रकार आहे. आपण ग्रेट कसे आहोत हे सांगण्याच्या नादात इतरांची भरपुर टिंगल टवाळी करणे एव्हडेच या कुचेष्टेखोर लोकांना जमते. या लोकांना कुचके किंवा कुचक्या मनोवृत्तिचे म्हणतात. ज्या वेळी एखाद्या समुहात किंवा ग्रुपमधे काम करण्याचे असते त्या ठिकाणी ही मनोवृत्ती घातक ठरते. आपल्या कुचक्या स्वभावामुळे हे लोक कळत नकळत सगळीकडे आपल्यासाठी शत्रु निर्माण करत असतात. आपल्या कुचक्या स्वभामुळे अनेक टॅलेन्टेडलोकांना आयुष्यात मागे पडावे लागले, एकटे पडावे लगले अशी अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत.

उद्या, उध्धटपणा, आळस, वाईट सवयी, भिती व कुचेष्टा हे आपल्या प्रागतिच्या आड येणारे सहा प्रामुख अडथळे किंवा अडचणी आहेत. त्या प्रत्येकाच्या मनामधे असतातच. आपण सगळेच यांचे किंवा यामधील काहिंचे शिकार झालेलो असतो. जे या अडथळ्यांवर मात करण्यामधे यशस्वी होत असतात त्यांची प्रगती होत असते. ज्यांना हे जमत नाही ते मागे पडतात. अर्थात यावर मात करणे ही गोष्ट वाटते तेव्हडी सोपी नाही. त्यासाठी आवश्यकता असते ती उच्च दर्जाच्या मनोनिग्राहाची, योग्य अशा मानसिकतेची व योग्य अशा मार्गदर्शनाची. पण हे अशक्य मात्र नक्कीच नाही.
योग्य मार्गदर्शनाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपण खरोखरच भाग्यवान आहोत. आपले सर्व धार्मीक ग्रंथ, रामायण- महाभारतासारख्या कथा, गितेसारखे प्रसंग, द्यानेश्वरांची द्यानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामिंचे दासबोध किंवा मनाचे श्लोक, एव्डडेच नव्हे तर सत्यनारायणाच्या पुजेमधे शेवटी ज्या पांच कथा सांगीतल्या जातात त्यांचे मनःपुर्वक श्रवण केले तरी पुरे.

हल्ली सिक्स सिग्मा ( Six Sigma ) हे तंत्र फार लोकप्रीय झाले आहे. अनेक कारखान्यांमधे व कंपन्यांमधे हे तंत्र प्राभावीपणे वापरण्यात येते. आपण जे काम करणार आहोत त्यांत संभाव्य अडचणी किंवा अडथळे काय किंवा कोणते येऊ शकतात हे आधीच ओळखणे किंवा हुडकुन काढणे. आणि प्रत्यक्षात असे अडथळे किंवा सडचणी आल्या तर काय उपाय योजना करयची हे आधीच ठरवणे हा या तंत्राचा मूळ गाभा आहे. अशी अडचण किंवा अडथळे आल्यास आपले आडत नाही. आपण आपले काम वेगाने व पध्धतशीरपणे तसेच वेळेवर पार पाडु शकतो. हेच टेकनीक आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रागतिसाठी प्राभावीपणे वापरता येईल.

आपल्या प्रगतीमधे येणारे सहा संभाव्य अडथळे कोणते हे वर सांगीतले आहे. उद्याच्या कचाट्यातुन सुटका करुन घ्या. उध्धटपणा, आळस, वाइट सवयी यावर नियंत्राण ठेवा. भितिचा बागुलबुवा मनातुन काढुन टाका. शक्यतो कुचेष्टेचा आश्रय घेऊ नका. हे माणसाच्या प्रागतिचे सिक्स सिग्माटेकनीक आहे. हे जर आचरणात आणले काय बिशाद आहे कोणाची आपल्या प्रागतीमधे अडथळे आणायची?
                   
( हा लेख पुण्याच्या सकाळ मधे 10 ऑगस्ट 2010 च्या अंकात प्रासिध्ध झाला आहे )
Ulhas H. Joshi
उल्हास हरी जोशी
=========================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: