शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

एका कुणाला करू नका ढाल, स्वकर्तृत्वाची पेटवा मशाल!


Mangala Bhoir



                                 सावरकर ,पटेल .नेहरू ,टिळक .,शास्त्री ,आंबेडकर  यांच्या सारखे बनणे जमले नाही तरी त्यांचे विचार तर आपण अंगिकारू शकतो. एक निर्भय,नीतिमान,देशप्रेमी, स्वाभिमानी नागरिक तर बनू शकतो! जेव्हा असा नागरिक प्रत्येक जण बनेल,तेव्हा हे सुराज्य दिसेल. मानसिक गुलामगिरीतून  मेंढरे बनवले आहे आपल्याला,कोणीही उल्लू बनवू शकतो,कारण स्वतःचा विचार करणेच विसरलो आहोत! कोणा सारखे बनून,किंव्हा त्याचे नाव घेवून आपले स्वतचे नाव मोठे न करता नितीमुल्य व देशप्रेम यांना मोठे करणारा खरा महान असतो! आपल्या पिढीला फुकटचे स्वातंत्र्य मिळाले,त्यांना कसली किंमत असणार? त्या स्वातन्त्र्याचा कसा लाभ घ्यायचा याची लायकी तरी कुठे? मुठभर इंग्रज राज्य करू शकले,आता तसेच त्यांच्या जागी मुठभर राजकारण्यांनी देशावर सत्ता गाजवली. नुसते म्हणायला लोकशाही,पण अर्थ कुठे समजू दिला कोणाला या लोकशाहीचा?
 
                              समाजाचा सार्वांगीण विकास या लोकांना नकोच आहे,लोक जितके निर्बुद्ध राहतील तेव्हढेच त्यांची सत्ता मजबूत! सारया जनतेचा पैसा खिशात घालून हे मोठे झाले,कधी विचारले का त्यांना कोणी अरे तुझ्या कडे इतका पैसा आला कुठून? अन्याय सहन करण्याची,हा जी हा जी करण्याची सवय रक्तात मुरली. हा षंढ पणा  कधी जाणार? पुरुषार्थ कधी येणार?

                              पैशाला स्वतःचे अस्तित्व व स्वत्व नसते, परंतु माणसाला आपले अस्तित्व व स्वत्व असते. माणसाला वाटते की पैशावरून त्याची किंमत ठरते,जेव्हा मनुष्याला उमजेल  स्वतःची किंमत तेव्हा ते आपले स्वत्व गहाण टाकणार नाहीत! तेव्हाच भ्रष्टाचार होणार नाही!
 
                              कोणामागे जावून नाही हे होणार डोळसपणे कृती करणे अजूनही नाही! इतके लाखो लोक आंदोलनाला पाठींबा देत आहेत,त्यांनी स्वतः आधी शपथ घ्या की मी लाच देणार नाही घेणार नाही,नीतीने वागेन! मी पण अण्णा तू पण अण्णा,अरे हे काय आहे? प्रत्येकाला  मी कसा बनेन हे समजायला हवे,दुसऱ्यातील चांगले गूण आचरण करा,पण आपली बुद्धी परत गहाणच टाकत आहात हे कळायला हवे! अनेकांना अण्णा कोण माहितीही नाही,त्यांच्या विषयी काही माहिती नाही,मिडियाने  जसे एखाद्या उत्पादनाची जाहिरात करून मोठे करावे तसेच आहे हे! अरे अण्णा हा काय ब्रांड आहे का? विचार शिल कृतीची गरज आहे.
 
                             कायदा पास करून घेण्या साठी आंदोलन झाले,तरी पुन्हा निवडनुकान  मधूनच चांगले प्रतिनिधी निवडावेत.  बाह्य व्यवस्था सबळ करणे हे लोकशाहीला धोक्याचे असते.  भ्रष्टाचार विरोध साठी सारे जागृत झाले आहेत,तर तो आपण स्वतः करायचा नाही हे ठरवा! जनता जागृत झाली हे चांगले आहे,पण ती कायदा पास झाला,किंव्हा अण्णा न चे उपोषण थांबले की पुन्हा निद्रिस्त होणार नाही व स्वतःचे अधिकार जाणून घेईल ,मतदान करेल ,हक्का  साठी लढेल असें चित्र व्हायला हवे. एकच अण्णा काय ते पाहतील  अशी ढाल न करता, प्रत्येकाने स्वतःतील पुरूषार्थ जागृत करून मी माझे कुटुंब,समाज व देशा चे रक्षण करेन हे कृतीने दाखवू या  व या सुराज्याचे दिशेने वाटचाल सुरू करू या! 
 
एका कुणाला करू नका ढाल, स्वकर्तृत्वाची पेटवा मशाल!
                                                                                                                                                                                                                                                                                                                                मंगला 

28568_1447009495901_1253087005_1230244_1214675_n.jpg

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: