शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

ऋणानुबंध.......नातेसंबंधाची एक पायरी

Vinit Vartak
ऋणानुबंध.......नातेसंबंधाची एक पायरी

आजच्या युगात या शब्दावर किती लोक विश्वास ठेवतील या बदल शंकाच आहे.
ऋणानुबंध बोलायला जितका कठीण तितकाच नाते संबंधात ते असणं हे हि तितकीच
अश्यक्य कोटीतली गोष्टी झाली आहे. घड्याला कडे बघून धावणारे आम्ही ज्या
तरहेने धावतो आहोत कि घरतल्या आपल्या माणसांकडे बघयला वेळ नाही तिकडे
ह्या ऋणानुबंध चा विचार कोण करणार. ९.१३ ची लोकल किती उशिरा आहे ह्यात
आपला जास्त लक्ष असत घरात कोण आजारी आहे या पेक्षा.
माणूस धावून धावून आज या कलियुगात इथपर्यंत येऊन पोचला आहे.विज्ञानची कास
धरणारे आम्ही देव, धर्म, आत्मा परमात्मा ह्यांना जाचक रूढी मनात आलो आहोत
किवा अश्या गोष्टी ज्या विज्ञानाने  सिद्ध करता येत नाहीत त्या सर्व ह्या
जगात नाहीत असा काहीसा मतप्रवाह असणारी आजची तरुण पिढी या शब्दाचा वापर
तर सोडाच पुन ऐकून आश्चर्य चकित होते. मागच्या जन्मीचे किवा एखाद्या
व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी काही ऋणानुबंध असू शकतात हा विचारच करू शकत
नाही.
माझ्या आजू बाजूंच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना क्रम पाहिल्यावर मात्र असा
काही होऊ शकते असा मला वाटते आता तुम्ही म्हणाल कि सगळे थोतांड आहे किवा
कोणी तरी बाबा ने आपला धंदा चालवण्यासाठी दिलेला गुरु मंत्र आहे वगेरे.पण
जर आपण खरच विचार केला तर हि गोष्ट इतकी पण खोटी नाही. आपण आयुष्यात
अश्या अनेक लोकांना भेटतो किवा आपल्या आयुष्यात असे अनेक जण येतात कि
ज्यांचा आपला परिचय नसतो किवा काही देणा घेणा नसते तरी पण अश्या लोकांकडे
आपण आकर्षित होतो. कधी कधी हे आकर्षण त्या व्यक्तीच्या वागणं, बोलणं किवा
दिसणा यावर अवलंबून असू शकते पण सगळ्याच वेळी अस असेलच अस नाही काही वेळा
काही कारण नसताना आपण आकर्षित होतो. आणि हे सगळ्यांचा बाबतीत घडते.
अस म्हणतात कि प्रत्येक व्यक्ती आपल्या आजू बाजूला एक वैचारिक वर्तुळ
म्हणूयात किवा ज्याला इंग्रजी मध्ये और म्हणतात ते निर्माण करत असतात
तुमचे वैचारिक वर्तुळ जर त्या व्यक्तीच्या वर्तुळाशी सहमत होत असेल तर
आपण आकर्षित होतो आणि नसेल तर उगाच आपल्याला त्या व्यक्तीची चीड येते .
हा अनुभव आपण सर्वांनी घेतला असेल. यालाच काही लोक ऋणानुबंध चा नाव देतात
कि त्या व्यक्तीशी आपले काही आदिजान्माचे वगरे ऋणानुबंध आहेत किवा काही
तरी संबंध आहेत कि आपण त्या व्यक्तीकडे खेचले जातो आणि विना कारण
आपल्याला ती व्यक्ती आवडत असते किवा आवडायला लागते. आणि हळू हळू आपले
संबंध अधिक दृढ होऊन जातात नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी मध्ये प्रत्येकाचा
अनुभव वेगळा असेल पण असा का होता ह्याचा शोध फार कमी लोक घेतात.
आज नात्यांमध्ये असलेली आपुलकीची भावना नष्ट होत चालली आहे. प्रत्येक
नात्याकडे फायदा आणि तोटा या नजरेतून बघितलं जात आहे. प्रेम या विषयवार
लिहणारे किवा करणारे म्हणतील कि ते सुधा आज व्यवहारिक गोष्टी बघून केलं
जाते. मग अश्या वेळी मनातली घालमेल आणि मनात असणऱ्या काही गोष्टी क्या
ज्या फक्त तुमच्या आहेत किवा ज्या व्यक्ती बरोबर आपला मन मोकळा होऊ शकते
अश्या व्यक्तीचा शोध केला जातो.. आज सोशल नेत वर्किंग ला मिळणारा प्रचंड
प्रतिसाद हे ह्याच मनाचा द्योतक आहे कि आपण नातेसंबंधात कुठे तरी कमी
पडतो आहोत.आणि मग आपण त्या व्यक्तीचा शोध घेतो कि अशी व्यक्ती कि जिच्या
बरोबर मी माझा मन मोकळं करू शकेन आणि जिच्या बरोबर माझे विचार जुळतील
किवा ऋणानुबंध जुळतील..
प्रेम या विषयवार खूप बोललं जात लिहिलं जाते पण प्रेमाची पहिली पायरी हि
ऋणानुबंध पासून सुरु होते यावर आपल्या पेकी कोणी विचार करताना दिसत नाही.
आपल मन हे आपल्याला सांगता कि अमुक एक व्यक्ती शी आपलं जुळत किवा आपलं
नाही जुळत पण कितीदा आपण त्याचा ऐकतो. आणि मग त्याचे परिणाम आपल्याला
भोगायला लागतात किवा नातेसंबंधात आलेले दुरावे हे त्याचेच द्योतक आहे. आज
या विषयवार विचार करायची गरज आहे असा मला वाटते. ऋणानुबंध हे आदल्या
जन्मीचे असोत किवा आपल्या वर्तुलामुळे निर्माण होणारे असोत आज
प्रत्येकाला त्याची गरज आहे. एका एका क्षणावर धावणाऱ्या आजच्या जगात
आयुष्याची अनेक वर्ष महत्वाची आहेत कारण एक नातेसंबंध निर्माण वाहयला कधी
कधी तुम्ही पूर्ण आयुष्य लावता आणि जर ते निभावलं गेलं नाही तर मग
आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही.
(या लेखात लिहिलेले सर्व विचार असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा उदेश नाही आहे. )

तुमचाच ,

विनीत वर्तक.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: