शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

गौरी गणपती



वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघनाम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी किंवा सकाळी उठल्याबरोबर करावयाची हि प्रार्थना लेखाच्या सुरवातीला करून आपण त्याचे आशीर्वाद घेऊ,कारण या महिन्याची सुरुवातच या मनमोहक लहान थोरांचा आवडता, गणपतीबाप्पाच्या येण्याने होत आहे.
  सप्टेंबर  ला "गणेश चतुर्थी" आहे.आज ज्या प्रचंड स्वरूपाच्या मूर्ती ,उत्सव चालू आहेत त्याची सुरुवात लोकमान्यांनी खूप
 
वेगळ्या उद्देशाने केली होती .तो मुल हेतू बाजूला राहून एक प्रकारे बाजारी स्वरूप गणेशोत्सव ,नवरात्र या उत्सवांना आले आहे.
बाप्पा घरी आल्यापासून ते जाईपर्यंत सण सुदींचे वातावरण घरात असते,अगदी दीड दिवस ते अनंत चतुर्थी असे त्याचे आगमन
आपल्या घरी होते. हि एकाच देवता अशी आहे कि लहानांपासून थोरांपर्यंत,सर्व,साधक उपासक यांना आवडते.साधारणपणे गणपतीपासून
 
ते दिवाळीपर्यंत  सणांची  अगदी लयलूट असते.
२ सप्टेंबर - ऋशिपंचमी-हे व्रत ७ वर्ष करतात.आपल्या पूर्वज आणि ऋषींनी केलेल्या कार्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी हे केले जाते.
या दिवशी  नांगरत न केलेल्या भूमीतील धान्ये, फळे,भाज्या कंद इ ,चा आहारात समावेश असतो. स्त्री देहाची अशुची असताना
शिजवलेले अन्न ,सूक्ष्म रूपाने काही दुष्परिणाम होतात.सध्याच्या काळात ते टाळणेही अशक्य आहे, त्यासाठी हे व्रत आपल्या देहिक व
वातावरणातील शुद्धीकरण करण्यासाठी केले जाते.
४ सप्टेंबर -ज्येष्ठ गौरी व्रत-बर्याच घरातून हे व्रत करतात. या देवतांचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर,पूजन ज्येष्ठा, व विसर्जन मुळ नक्षत्रावर होते.
लक्ष्मिचि ज्येष्ठा बहिण अलक्ष्मि हिची व लक्ष्मिचि अशा दोघींची पूजा होते.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या स्वरुपात हिची पूजा होते.
११ सप्टेंबर-अनंत चतुर्दशी- हे व्रत १४ वर्षे केले जाते,धन संपत्तीसाठी  हे व्रत करतात.या पूजेत प्रामुख्याने अनंत, अनंती हे दोरकारूपी
व शेष यांची पूजा होते. ज्यास अंत नाही तो अनंत!तो म्हणजे परमेश्वर ,आणि तो सर्वभूती पाहणे म्हणजेच अहंकार-रहित होणे ,व हि स्थिती आली
कि ईश्वर त्याला धनसंपत्ती,वैभव हे सर्व देतो.हा या व्रताचा मुख्य हेतू आहे
.
१३ सप्टेंबर-पितृ-पंधरवड्यास  सुरुवात ! आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तींचे स्मरण कामाच्या व्यापामुळे होत नसेल या १५ दिवसात त्या त्या तिथीला
त्या व्यक्तीची आठवण म्हणून  श्राद्धास्वरूप विधी घरात केले जातात.तेही जमले नाही तर सर्वपित्री अमावस्येला मात्र सर्व पितरांचे स्मरण केले जाते.
२८ सप्टेंबर-घटस्थापना -या दिवशी आपल्या कुलदेवतेचे प्रतिमा किंवा तक,विड्याच्या पानावर ठेवून नवरात्र बसवितात. अखंड दीप,माळा, सप्तशती पठण
उपवास,जागरण इ , कार्यक्रम या ९ दिवसात होतात.
नवदुर्गा-प्रथमं शैल्पुत्रीच, द्वितीयं ब्राम्हचारिणी,तृतीयं चान्द्रघान्तेती, कुश्मांदेती चतुर्थकम|पंचमां स्कान्दमातेती षष्ठं कात्याय्नितीच,सप्तमं कालरात्रीति,
महागौरीती चाष्टमम|नवमं सिधीदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तिता||उक्तान्येतानि नामानि ब्राम्हनैव महात्मना|| भारतात प्राचीन काळापासून "शक्ती" म्हणजेच दुर्गेची
उपासना चालू आहे. देवी उपासना हि शीघ्र फलदायी आहे. मार्कंडेय ऋषींनी ब्राम्हदेवाना हि रूपे कोणती असे विचारले तेव्हा त्यांनी वरचा श्लोक
सांगून तिची माहिती दिली.शक्तीचे पुरुषरूप हे "भव" म्हणजेच शंकर व स्त्रीरूप म्हणजेच भवानी किंवा पार्वती!यांचा संबध आताच्या युगाशीही आहे.
१)शैलपुत्री -हिने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला म्हणून हि शैलपुत्री!हिचे वाहन बैल असून उजव्या हातात कमळ,डाव्या हातात त्रिशूल आहे.हिच्या
 
ध्यान्मान्त्रात तिला यशस्विनी म्हटले आहे.आताच्या काळातील स्त्रीने एक बोध घ्यावा कि फक्त महान पित्यापोटी जन्म घेऊन भागत! नाही तर
स्वत;ला सिद्ध करून यशस्विनी होता येते "इंदिराजी"न प्रमाणे! ब्राम्हचारिणी-हे देवीचे २रे रूप!नारदांच्या उपदेशाप्रमाणे शंकर हाच पती मिळावा म्हणून उग्र
तपश्चर्या देवीने केली.हिच्या डाव्याहातात जपमाळ ,उजव्या हातात कमंडलू आहे.हि "तपस्विनी" आहे.आजच्या कालातील सिंधुताई सपकाळ हे याचे उदाहरण आहे.
३)चंद्रघंटा-हे ३ रे रूप!हिच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचे चक्र आहे हिचे वाहन सिंह आहे.प्रापंचिक कष्टातून मुक्त करणारी चंद्रघंटा,व एकाच वेळी अनेक
 
आघाड्यांवर लढणारी आजची नोकरी करणारी "उद्योगिनी"यांच्यात साम्य आहे ?४)कुश्मंडा-हे४ थे रूप!जेव्हा सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा आपल्या
 
मंद स्मिताने हिने ब्रम्हांड उत्पन्न केले.हि "सुहासिनी"व आताच्या" सुवासिनी"सुपात्नी संसार वृद्धीसाठी आदिशक्ती म्हणून ब्रम्हांडाचा म्हणजेच प्रपंचाचा
भर उचलून धर्तेच न?५)स्कंदमाता-हिच्या मांडीवर स्कंद म्हणजेच कर्तिक्स्वमिआहेत.मातेचे हे मंगल रूप कोणत्याही मातेला लागू होते.कारण आपणही
 
देवीला आई म्हणूनच हक मारतो न? ६)कात्यायनी-हि भक्तीचे फळ लगेच देते.हिनेच दशमीला महिषासुराचा वध केला .किरण बेदींसारख्या अनेक तेजस्विनी आपल्यात वावर्तातच कि!७) कालरात्री-अनिष्टाला दूर करणारी हि  देवी काळ्या रंगाची व भयंकर रुपाची आहे.पण सज्जनांना मात्र तिचे अभय आहे.
८)मातेचे हे ८ वे रूप!हि महागौरी आहे शुभ्र वस्त्रवृता आहे.हि पाप्नाशिनीही आहे ९) सिद्धीदात्री )हि भक्तांना त्यांच्या भक्तीने अष्टसिद्धी देते.हिचे रूप अर्धानारीचे आहे
.
मुळात प्रत्येक पुरुश्रुपात एक स्त्री शक्ती आहे व स्त्री रुपात एक पुरुषरूप सिद्ध आहे.हि मुळमाया आजच्या स्त्री शक्तीत  वास करते आहे.म्हणूनच पुराणकालीन नावापेक्षा यशस्विनी,तपस्विनी,उद्योगिनी,सुहासिनी,पद्मामाता,तेजस्विनी,अभायीनी,पापनाशिनी व सिद्धीदायीनी या नवीन रूपांची ओळख आपण करून घेतली तर तीच खरी या नाव्दुर्गांची उपासना ठरावी.
  
या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता |नमस्तस्यै नमो नमा:||
Madhvi Dani
madhvi dani


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: