शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

||फस्ट मिटिंग ||



मुंबई कधीही न झोपणार शहर, पण इथे सुधा मनमोहक सकाळ रोज  होते  बर का ! अशीच सकाळची वेळ होती  सुर्यदेवांची कोवळी किरणे अलगद शरीरास स्पर्श करून जात होती 

            काल रात्री एका मित्राने सकाळी भेत्न्याच वचन   माझ्याकडून घेतल होत. त्यालाच  भेटण्यासाठी म्हणून मी घराबाहेर पडलो. ठरल्या ठिकाणी अगदी वेळेचा आधीच फोचायची माझी सवयच होती, साधारण ९:३० ची वेळ असावी, ह्या अनोलखीनच्या जगात तिथे मी एकटाच होतो जो प्रतेक येणाऱ्याजानार्याकडे  टक  लाऊन  पाहत  होतो, मिनिटाला १०० पाऊले असा इथे नियम असतो हे वाक्य खरच आहे हे त्या दिवशी मी प्रत्यक्ष अनुभवल. तितक्यात   काही पावल माझ्या दिशेने दबकत येताना जाणवली, पण मागे वळून पाहण्याच्या अगोदरच कोणीतरी माघून डोळे गच्च पकडले,  अनेकांची नाव घेतली पण नाकाराठी हुंकार कानावर पडले, डोळ्यांवरचा हाथ अलगद सरकला ती व्यक्ती दृष्टीक्षेपात आली, ती होती १७ ते १८ दरम्यान रेंगाळत असलेली एक तरुणी जिला मी पहिल्यांदाच पाहत होतो, मी काही बोलण्याचा अगोदरच ती उत्साहाने बोलली
          
HBTC HBTC !!
काय ?
हाच   password ठरला होता ना  आपला ? ती हळुवार  स्वरात बोलली
            
                 क्षणभर खूप हरवल्या  सारख जाणवल, पण तिच्या चाललेल्या बर्याच वेळेच्या बद्बडीत एक गोष्ट उमजली ती अशी, कि आज ह्याच वेळेवर  blue shart  black pant घालून येणाऱ्या कोण्या तरुणाशी तिची  first meeting होती. अगदी योगायोगाने मी त्या दिवशी त्याच पोशाखात तिथे फोचलो होतो, तिला बर्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलू देईनाच.  ती काय  बोलत होती ह्याकडे माझ पूर्ण लक्ष होत,
               
               शेवटी मला collge  ला उशीर होतोय, आपण  उद्या पुन्हा  इथेच भेटू अस बोलून  ती निघून  गेली प्रत्यक्ष १० मिनिटे माझ्या पुढे उभी  राहून  मला एकही शब्द बोलू न देणाऱ्या त्या अनोळखी मुलीला तिच्या   होणार्या   गैरसमजा बद्दल  उद्या नक्की सांगू असा निश्चय करून  मी, त्या विचारांना  स्वल्पविराम दिला.

             ज्याला भेटायला आलो तो अजून आला नाही म्हणून मी त्याला फोन लावला, त्याचाशी बोलत असतानाच अचानक खांद्यावर भक्कम अशी थाप पडली, फोन सावरतच मी त्या दिशेला वळलो, साधारण माझ्याच वयाचा पण उंचीने  माझ्याहून ४ बोट उंच असलेला  एक तरुण होता तो. रंगाने गोरा, parsnality कि म्हणतात  ती  खूप छान होती, त्याचात आणि माझ्यात थोड सुद्धा साम्य नव्हत, फोन ठेवत मी त्याला विचारल.
कोण तू ?
ती मुलगी गेलेल्या दिशेने बोट दाखवत तो बोलला
" ती इथे मला भेटायला आली होती " 
" तिला मला भेटायचं नव्हतचफक्त  माल कसा आहे ते पाहून मग पटवणार होतो  " 
म्हणूनच तर मी तिने सांगितलेला पोशाख पण घालून नाही आलो पहा ! त्याचे ते शब्द कानात एखाद्या बाणासारखे घुसत होते  
स्पष्टीकरण देताना बोलला कि काही दिवसांपूर्वी   Orkut  वर त्यांची ओळख  झाली  होती, बर्याच दिवसांच्या time pass  नंतर आज इथे तिला प्रत्यक्ष पहायचं होत 
क्षणभर खूप राग आला त्याच्या अशा  atitude चा पण व्यक्त करयला माझा त्याचाशी किवा  तिच्याशी तरी काय समंध  म्हणून शांतच उभा होतो 
काही वेळ असेच अजागळ उद्गार काढून तो निघून गेला 

            त्या दोघांशी  साधी ओळखही नसताना त्या दोन अनोळखी जीवाच्या विचारारांत किती फरक होता ? माझ मन त्या दोघाची तुलना करण्यात व्यस्त झाल. ती मुलगी किती भोळी जिने अंधळा विश्वास ठेऊन ह्याचाशी जवळीक केली आणि त्याचे तिच्या बदलचे विचार इतके घाणेरडे, कधी नही ती त्या अनोळखी मुलीबद्ल  चिंता वाटू लागली डोळेही किंचितसे पाणवले. डोळ्यातले पाणी अलगद रुमालाने टीपल.

          कदाचित त्या मुलीच्या पदरात  पुण्याचा साठा जास्त असावा, म्हणून नियतीने हि भेट घडवून  आणली असावी. जर असेच काही असेल तर तिला ह्या सर्व प्रकारातून बाहेर काढण्याची जवाबदारी मी नक्की पार पाडेल, उद्या तिची ह्याच ठिकाणी भेट घेऊन तिला सर्व सांगेन आणि ह्यातून सावरण्याचा प्रयत्न करेल 

            हा लेख जरी वाचताना अपूर्ण वाटत असला तरी ह्याचा शेवट ठरलेला आहे, ते दोघेही त्याचं  स्वतंत्र जीवन आपापल्या  पद्धतीने  जगायला कहीच दिवसांत सज्ज  असतील, असे मी घडवून दाखवेल.

          मित्रानो ! आपण ह्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात वावरणारे रोज असंक्य नाती जोडतो, त्यांची कदरही तितकीच करयला पहिजे, अनोळखी म्हणून काय झाल प्रतेकाला स्वतंत्र भावना आहेत त्यांना   
जपलं पाहिजे, प्रतेकाला एक मन नावाची गोष्ट आहे तिचा विचारहि केला पाहिजे. विश्वास ठेऊन ह्या नात्यांत आणल्या गेलेल्या जवलीक्तेचा गैरफायदा घेणारे इथे आणखी  जन्मायला  नकोत ह्या साठी प्रयत्न करूयात
धन्यवाद !

तुमचा लाडका 
कविकुमार   

Jeevan Tamhane 
===========================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: