शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

एका कुणाला करू नका ढाल, स्वकर्तृत्वाची पेटवा मशाल!


Mangala Bhoir



                                 सावरकर ,पटेल .नेहरू ,टिळक .,शास्त्री ,आंबेडकर  यांच्या सारखे बनणे जमले नाही तरी त्यांचे विचार तर आपण अंगिकारू शकतो. एक निर्भय,नीतिमान,देशप्रेमी, स्वाभिमानी नागरिक तर बनू शकतो! जेव्हा असा नागरिक प्रत्येक जण बनेल,तेव्हा हे सुराज्य दिसेल. मानसिक गुलामगिरीतून  मेंढरे बनवले आहे आपल्याला,कोणीही उल्लू बनवू शकतो,कारण स्वतःचा विचार करणेच विसरलो आहोत! कोणा सारखे बनून,किंव्हा त्याचे नाव घेवून आपले स्वतचे नाव मोठे न करता नितीमुल्य व देशप्रेम यांना मोठे करणारा खरा महान असतो! आपल्या पिढीला फुकटचे स्वातंत्र्य मिळाले,त्यांना कसली किंमत असणार? त्या स्वातन्त्र्याचा कसा लाभ घ्यायचा याची लायकी तरी कुठे? मुठभर इंग्रज राज्य करू शकले,आता तसेच त्यांच्या जागी मुठभर राजकारण्यांनी देशावर सत्ता गाजवली. नुसते म्हणायला लोकशाही,पण अर्थ कुठे समजू दिला कोणाला या लोकशाहीचा?
 
                              समाजाचा सार्वांगीण विकास या लोकांना नकोच आहे,लोक जितके निर्बुद्ध राहतील तेव्हढेच त्यांची सत्ता मजबूत! सारया जनतेचा पैसा खिशात घालून हे मोठे झाले,कधी विचारले का त्यांना कोणी अरे तुझ्या कडे इतका पैसा आला कुठून? अन्याय सहन करण्याची,हा जी हा जी करण्याची सवय रक्तात मुरली. हा षंढ पणा  कधी जाणार? पुरुषार्थ कधी येणार?

                              पैशाला स्वतःचे अस्तित्व व स्वत्व नसते, परंतु माणसाला आपले अस्तित्व व स्वत्व असते. माणसाला वाटते की पैशावरून त्याची किंमत ठरते,जेव्हा मनुष्याला उमजेल  स्वतःची किंमत तेव्हा ते आपले स्वत्व गहाण टाकणार नाहीत! तेव्हाच भ्रष्टाचार होणार नाही!
 
                              कोणामागे जावून नाही हे होणार डोळसपणे कृती करणे अजूनही नाही! इतके लाखो लोक आंदोलनाला पाठींबा देत आहेत,त्यांनी स्वतः आधी शपथ घ्या की मी लाच देणार नाही घेणार नाही,नीतीने वागेन! मी पण अण्णा तू पण अण्णा,अरे हे काय आहे? प्रत्येकाला  मी कसा बनेन हे समजायला हवे,दुसऱ्यातील चांगले गूण आचरण करा,पण आपली बुद्धी परत गहाणच टाकत आहात हे कळायला हवे! अनेकांना अण्णा कोण माहितीही नाही,त्यांच्या विषयी काही माहिती नाही,मिडियाने  जसे एखाद्या उत्पादनाची जाहिरात करून मोठे करावे तसेच आहे हे! अरे अण्णा हा काय ब्रांड आहे का? विचार शिल कृतीची गरज आहे.
 
                             कायदा पास करून घेण्या साठी आंदोलन झाले,तरी पुन्हा निवडनुकान  मधूनच चांगले प्रतिनिधी निवडावेत.  बाह्य व्यवस्था सबळ करणे हे लोकशाहीला धोक्याचे असते.  भ्रष्टाचार विरोध साठी सारे जागृत झाले आहेत,तर तो आपण स्वतः करायचा नाही हे ठरवा! जनता जागृत झाली हे चांगले आहे,पण ती कायदा पास झाला,किंव्हा अण्णा न चे उपोषण थांबले की पुन्हा निद्रिस्त होणार नाही व स्वतःचे अधिकार जाणून घेईल ,मतदान करेल ,हक्का  साठी लढेल असें चित्र व्हायला हवे. एकच अण्णा काय ते पाहतील  अशी ढाल न करता, प्रत्येकाने स्वतःतील पुरूषार्थ जागृत करून मी माझे कुटुंब,समाज व देशा चे रक्षण करेन हे कृतीने दाखवू या  व या सुराज्याचे दिशेने वाटचाल सुरू करू या! 
 
एका कुणाला करू नका ढाल, स्वकर्तृत्वाची पेटवा मशाल!
                                                                                                                                                                                                                                                                                                                                मंगला 

28568_1447009495901_1253087005_1230244_1214675_n.jpg

बाई




Sharmila Ranade

सिगारेट चा एक खोल  झुरका घेवून बाई  खदखदून हसायला लागली. अगदी पोट धरून... थांबेचना.  
धुरांच्या वर्तुळातून तिला फिकट दिसू लागले तिचे पहिले कवी संमेलन.
-------------------------------------------------------------
साथ हवीये तिला
अशा हातांची जे झेपावत नाही कायमच पाठीवरून पुढे
कधी कधी थांबून ते देतात ही दिलासा थोडासा
पाठीवरी हात ठेवून.....
डोळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांना दिसते पाण्याची लकेर
छोटीशी काठाशी जमलेली.....
अन मग समजुतीचे हात फिरतात त्या पाण्यावरून
कधीतरी वडिलांच्या मायेने मिठीतही घेतात अबोलपणे.....
ते होतात मग जेंव्हा अशा सशक्त शृंगाराचे दूत
तेंव्हा तिला भास होतो सर्वसमावेशक अशा पुरुषोत्तमाचा !
--------------------------------------------------------------------
कविता वाचनाच्या कार्यक्रमातली शेवटची कविता बाई ने वाचली अन कार्यक्रम आटोपला. रात्री बराच उशीर झाला असावा.
अभी hall च्या दारात जांभया देत उभा होता. कोणाशी हि न बोलता बाई पटकन तिथून निघाली.
अभी शांत पणे गाडी चालवत होता.
***अभी कशी वाटली माझी कविता?
***हं
***अरे चांगली, वाईट काहीतरी म्हण ना
***शब्दांच्या खेळात फसवू नकोस मला ..कोरडा पाषाण आहेस तू..बाई कसली..मला ठावूक आहे You are impotent!!!
दुसर्यांदा ऐकला तो शब्द  अन बाई च्या हात-पायातली शक्तीच गळून गेली.
*********बाई तुझा उपयोग काय ग?
***माझा? उपयोग साठी असतं आपलं माणूस? मला वाटलं होता कि एक मेकामाधली उणीव भरून काढायची असते एक मेकांच्या साथीने. 
आणि काय नाही करत रे अभी मी तुझ्या करता? तू आजारी असताना तुझ्या उशाशी बसून असते रात्र रात्र.. कित्येक वर्ष तुझ्या पैशाची बेगमी करते आहे ..तुझं struggle चाललंय म्हणून.. मला वाटत कि तू खूप मोठा व्हावसं.
अन शय्यासोबत? ती कोणी करायची? कि त्या साठी बाजारात पाठवणारेस मला? 
अरे अभी, ती शय्यासोबत फुलवत न्यायची असते.....जेंव्हा शब्दांची भाषा संपते ना तेंव्हा सुरु होते स्पर्शाची भाषा. तू फक्त ओरबाडतोस ते सुख.
तू फक्त शरीराच्या भुकेला प्रतिसाद देतोस..आणि मनाच्या? 
**अगं romantic नाहीच आहेस तू. 
**ओह..असेल ही. romance ला व्यवहारासारखे नाही रे पहाता येत मला.
पाऊस पडून गेला होता. ओल्या झालेल्या रस्त्यावर बुचाच्या फुलांचा सडा पडला होता.अन त्याचा .मंद वास सगळीकडे भरून राहिला होता.
तिला तिचे होस्टेल चे दिवस आठवले. निरागस..प्रेमाच्या उत्कट, dreamy कल्पना असलेले. कसा असतो नाही माणसाचा प्रवास? कुठे जायचे असते अन कुठे येऊन पोचतो?! तिने डोळ्यातले पाणी हलकेच पुसले.
**By the way,  मला तुला काही सांगायचेय.
***सोडणारेस मला?
****हं हो, तुला कसे कळले?
***इतकी ओळख पटली आहे मला तुझी..बाई म्हणाली.


जळत्या सिगारेट चा जोरात चटका बसला अन बाई भानावर आली. आठवणींनी तिला पार थकवले होते.
एव्हड्यात किल्लीने दार उघडून महेन आत आला. त्याने पहिले बाई हमसाहमशी रडत होती.
त्याने  ने तिला हाताला धरून उठवले आणि बेडरूम मध्ये नेले. बेडवर तिने अंग टाकले  आणि महेन चा हात घट्ट धरून रडायला लागली.
तिला हलकेच झोपवून महेन flat चे दार बंद करून निघून गेला.


दुपारचे चार वाजले असावेत.  दारावरच्या कर्कश्य बेल ने बाई  ला जाग आली. तिचे  डोके भणभणत
होते. तिने दार उघडले. दारात.. Dr पेंडसे. psychiatrist !


****काय बाई , झाली का झोप?
***** yes doc  आज अगदी गाढ लागली झोप. असं वाटलं खूप वर्षां ची बाकी होती कि काय.
***अरे good. you needed that. 
*** doc, मला ना आत्ता एक स्वप्न पडलं. खूप जवळचं  वाटणारं, खूप काही सुचवणार.
Tell me. त्या आधी चहा करतेस प्लीज??
*** बाई  ने चहा आणला. 
***हं बोल आता..काय पाहिलं स्वप्नात?...राजकुमार.. cowboy like Clint Eastwood? 
********मी आज एक भिकारीण पहिली स्वप्नात ..  ती माझ्यकडे पाहत होती अन छद्मी पणे हसत होती..तिच्या ताटातले काही मला देत होती..
डॉक ह्यावर काही बोलले नाहीत. बाई  त्यांच्या कडे भकास पणे बघत राहिली. 

बाई  तुझ्या कॉलेज मधल्या दिवसांबद्दल सांग ना मला काही.. काय काय केलस? डॉक ने विषय बदलला.
********खूप धमाल. काय दिवस होते ते तुम्हाला सांगू? सगळं काही जादुई ! तरल !
मी खूप सारखी प्रेमात पडायची तेंव्हा.....असं म्हणून ती हसली. 
तेंव्हा माझा एक मित्र होता. नीरज .. नीर म्हणायची मी त्याला. तो एका band मध्ये musician होता. ते माझं पहिलं प्रेम. कसला वेडा होता हो  तो. त्याने माझ्यासाठी खूप गाणी compose केली होती. तो अन मी जवळ येत गेलो. मी मनाने अन तो शरीराने. .he knew the end but failed in the process. इतका संयमाचा अभाव असतो एखाद्यात ? पण इतका जीव होता माझा त्याच्यावर कि मी ते सगळं कसबस निभावून नेई..त्याला आनंदी ठेवण्यासाठी.
You know Doc, I always believed in platonic love. But unfortunately men never believed me!!! किंवा असं ही असेल  
 कि माझ्या प्रेमाच्या अन शृंगाराच्या कल्पना फार वेगळ्या होत्या..who knows?!
हे अर्थातच म्हणा मला खूप उशिरा लक्षात आलं. पुरूषाच कसं असतं सांगू..शारीरिक जवळीक असेल तर तो तुमच्या सगळ्या मानसिक गरजा पूर्ण  करतो ..but not otherwise. नीर आला तसाच निघून गेला एक दिवस...माझ्या कडून खूप काही घेवून....प्रेम, विश्वास, जीवा-भावाची मैत्री अन ठेवून गेला माझ्या साठी  ...एक आयुष्यभर  खुपत राहणारा शब्द... impotent!!


Doc, मी ऐकला तो शब्द आणि कीव आली मला माझ्या आयुष्यात आलेल्या समस्त पुरुष जातीची.
पुरुष साठी बाई असण्याचे अर्थ इतकेच मर्यादित असतात? बाई असण्याचे अर्थ उमगले आणि माझ्यातली उरली सुरली इच्छा ही पार आटुन गेली.

ते दोन पुरुष होते  , वेगळ्या नावांचे, आणि असे अनेक...पण एकाच वृत्तीचे ...आहे ना मजा  ?
ह्या लोकांनी फक्त बाई मध्ये कमी पडलेली जागा दाखवून दिली...मी त्यांच्या साठी वेळो वेळी, आईची, बहिणीची, मैत्रिणीची, मुलीची घेतलेली जागा मात्र त्यांना कधीच दिसली नाही..


आणि महेन? ***डॉक म्हणाले.
****महेन...तो ही पुरुषच  पण Gay....म्हणजे वेग वेगळ्या अर्थाने आम्ही दोघेही विझलेले..त्यामुळेच आम्ही सुखात  एकत्र नांदतोय..
महेन paying guest म्हणून राहतो  माझ्या Flat मध्ये. पण सगळी काळजी वाहतो  माझी अन मी ही त्याची..एका अर्थाने सुखाचा संसार आहे आमचा. का माहितीये?
डॉक ने मन हलवली..
*** कारण आमच्या एकमेकाकडून अशा गरजाच नाहीत कि  ज्या आम्हाला पूर्ण करणे शक्य नाही.
conflict कुठे उदभवतो....जिथे एक अपेक्षा करतो आणि दुसरा अपुरा पडतो त्या पूर्ण करायला. असं म्हणा हव तर जेंव्हा गरजा ह्या interdependent असतात.
त्या अर्थी फार समजूतदार आणि सोयीस्कर आहे आमचं हे  नातं.! असं म्हणून बाई हसायला लागली.


You know doc, पूर्वी मी माणस शोधायला जायची माझ्या कवितेतून पण लवकरच उमगलं कि कल्पनेतला पुरुष फक्त कवितेत डॉक, सत्यात नाही, म्हणून तर कवितेत....
ती स्वप्नातली भिकारीण का हसतेय सांगू माझ्या कडे बघून? कारण जिला आयुष्यात काहीच मिळाले नाही, ती माझ्या पेक्षा एका बाबतीत मात्र खूप सुखी आहे, श्रीमंत आहे. ती तिच्या पुरुषाला सुखात ठेवते आहे,ती फार अपेक्षा ठेवत नाही..तिला फक्त शरीरच आहे. आता भिकारीण म्हटल्यावर मन तर कधीचेच मारलेले असेल. असो.
 आता माझ्या आयुष्याकडून काही अपेक्षा नाहीत, but  yes मृत्यू कसा हवाय सांगू?...
..... like a prolonged, eternal orgasm..असं म्हणतात कि सर्व भावना गोठवून टाकणारा अनुभव असतो तो... तो  उच्च बिंदू गाठायचाय मला. माझं आयुष्यभराच दुखः  तरी स्तब्ध होईल..आणि सरतेशेवटी एकदा तरी बाई म्हणून सिध्द व्हायचंय  मला. !! होईन ना?
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परवा खामगाव हुन फोन आला.
*******पमा ,अग मुन्नी गेली..
**** काय? अग काय बोलतेस  ? काय झालं?  
****जीव दिलान.....


पमा ला भोवळ येतीये असे वाटलं. सगळं बालपण समोर उभं ठाकल. . आता तरी मुन्नी ला भेटायचच...शेवटच तरी.
तिने घाई ने अर्ज खरडला आणि मिळेल ती गाडी पकडून खाम गाव ला निघाली..
रस्ता भर बालपणीच्या आठवणी  फेर धरून नाचू लागल्या. डोळे सारखे भरून येत होते .


 मुन्नी , तिची बाल मैत्रीण, तिची जीवा-भावाची  सखी... 
मुन्नी चांगली चार पाच वर्षांनी मोठी होती पमा पेक्षा. पण ती पमाला पमुताई म्हणत. मुन्नी जीव कि प्राण होती तिचा त्या वेळी  .
हसरी, मवाळ स्वभावाची पण फार चुळ बुळी होती मुन्नी . पमा  ला हा तिचा चुळ बुळे पणा मुळीच  आवडायचा नाही..कारण मग सारखी ती कुठे तरी गायब होई   कधीच एका जागी बसत नसे.  . ... 
बाहुलीचे लग्न असो, भातुकलीचा खेळ असो, भोंडला किंवा काहीही असो, मुन्नी कुठलीही गोष्ट अगदी मन लावून करायची. बाहुलीच्या लग्नात तर तिची कोण लगबग. खंर लग्न काय अशी तिची तयारी असत  . अगदी वर-वधू दोन्ही बाजूनी ती उभी रहायची.
**** अग मुन्नी तू तर मुलीकडची ना? मग इकडे वर पक्षात कशी? कोणी छेडले कि हसत हसत म्हणत, अय्या, खेळ तर आहे, जाऊ दे कि.
बाहुलीची पाठवणी करायची वेळ आली कि मात्र मुन्नी हळवी होई. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या मी खुपदा पहिल्या आहेत ..मग  मी तिच्या जवळ जाऊन म्हणायची..मुन्नी, खेळ तर आहे..जाऊ दे कि.  मग ती माझ्याकडे पाहून कसनुस हसत.
भातुकलीच्या खेळात तर ती किती नव-नवीन पदार्थ शोधून काढत. चुरमुऱ्याच्या पोळ्या, गुळ-दाण्याचे लाडू...काय न काय ती बनवायची. भांडणं होऊ नयेत  म्हणून मग तीच सारखं वाटप करायची..अनेक खेळ पण तिने शोधून काढले होते. "बस-बस", "दुकान-दुकान", "घर-घर"  असे कित्येक.
दिवस अन दिवस आम्ही खेळत बसायचो. दुपारी आई कशी बशी आम्हाला जेवायला बाहेर काढत. तिला माझ्या घरचे जेवण खूप आवडायचे.
***पमुताई, मी तुमच्या इथे  जेऊ ? असा मला ती अधून -मधून विचारत असे. मी तिला फारसं कधी जेव म्हटल्याचं आठवत नाही. ती घरात आली कि जमिनीवर बसे. भटांची माया मात्र  ऐटीत खुर्चीत येऊन बसत. मला याचा फार राग येई. मग मी तिला उठवून खुर्चीत बसवत. अशा वेळी का कोण जणे पण माझ्या आजीच्या कपाळावर अठी आलेली मला दिसे. नवरात्रात आमच्या घरी दहा दिवस कुमारिका बोलवत. माझ्या सगळ्या मैत्रीणीना बोलावले जायचे....मुन्नी सोडून..ती तर माझी जिवलग होती ना? मग तिला का नाही बोलवायचे?
एकदा मी आई ला या बद्दल विचारले, तर म्हणाली...आजी ला विचार.
लहानपणीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मोठी झाल्यावर मिळत गेली.


माझ्या साठी मुन्नी म्हणजे एखादे खेळणेच  होते.. मला  ती सारखी आस पास लागायची. खूप लळा होता तिचा अन जीव हि लावायची मी  मुन्नीला. पण तिला ही घर दार असेल, तहान भूक  असेल हे सोयीस्कार पणे विसरून जात  . मुन्नी ही माझे मन कधी मोडायची नाही.  ती नाचायची फार सुरेख. लय तिच्यात  अंगभूतच  होती. तिला हवे तसे कपडे घालून, चेहऱ्यावर  पावडर फासून मुन्नी ला नाचवायचा खास कार्यक्रम असे. तिला स्वताची फारशी काही मतं नसत. असतील तरीही तिला कधी कोणी ती विचारली नाहीत हे ही खरे. अंधार पडला कि  सगळ्यांच्या आया आपापल्या मुलींना घरी न्यायला येत. त्या वेळी मुन्नी कोपऱ्यात उभी राहून हसत राही...अन मग पायाने काही- बाही तुडवत एकटीच रस्त्याने खेळत खेळत निघून जाई...ती कुठे जाई कोणालाच ठावूक नव्हते. तिला घर होते का, आई-बाबा होते का हे प्रश्न आम्हाला कधी पडलेच नाहीत..लहानपणीच हे एक बरं असत. फारसे प्रश्न पडत नाहीत अन पडले तरीही त्याच्या उत्तराचा अट्टहास नसतो  . पण सकाळ झाली कि मात्र आम्हाला मुन्नी ची आठवण होई.  तिच्या डोक्यातून नेहमी काहीतरी भन्नाट कल्पना निघत. कधी उसाच्या ट्रक मागे धावत  जाऊन उस काढायचा, कधी चोकलेट च्या कागदात दगड बांधून मजा पहात  बसायच..असले सगळे उद्योग तिच्या संगतीने आम्ही करत असू.


असे मजेत दिवस जात असताना एके दिवशी मुन्नी आलीच नाही. मी खूप वाट पहिली. पण नाहीच. दुसरा दिवस गेला , तिसरा गेला ..चार-पाच  दिवसानंतर एके दिवशी शेवटी मुन्नी उगवली. पण ती एका कोपरयात जाऊन शांत बसून राहिली. शिवणापाणी, विटी-दांडू काहीच खेळेना. आणि हळू-हळू तर ती एकलकोंडीच होऊ लागली. आमच्या बरोबर तिचे हुंदडणे कमी व्हायला लागले. ती लांब परकर-पोलके घालू लागली अन सारखी मुलां कडे पाहून काही-बाही कुजबुजत राही. मला याचा खूप राग यायला लागला. मी एके दिवशी घरी जाऊन आईला हे सगळं सांगितलं. आई म्हणाली, अगं, मुन्नी मोठी झाली. मला नक्की म्हणजे काय झाली हे कळलं नाही पण त्या रात्री मी खूप खूप रडले. माझं कोणी तरी जिवलग मला सोडून जातंय असं वाटत राहिलं. दुसऱ्या दिवशी पासून मी मुन्नीच्या जास्तच सहवासात राहू लागले. ती आपल्याला सोडून जाईल कि काय कुठे अशी अनामिक भीती वाटत राही. मुन्नी जरी येत राहिली खेळायला, तरी पूर्वीची मज्जा काही त्यात नव्हती हे खंर!
तिच्या चेहऱ्यावरचे बालपण लुप्त होत गेले.
कालांतराने मुन्नी चे लग्न ठरले. आम्हीही मोठ्या झालो. आई च्या ओळखीने आमच्याच गावातील एका डॉक्टर च्या कंपांउडर शी तिचे लग्न लावले.. लग्नात मी तिला साडी घेतली. डोळे भरून आले होते मुन्नीचे. माझ्या गळ्यात पडून ती त्या दिवशी खूप रडली..
****** पमु ताई, तुम्ही होत्या म्हणून आई बापा विना असलेल्या मला आता घर मिळालं...
मला धक्काच बसला. हिला आई बाप नव्हते तर. मामा कडे राहत असत.
बर झालं आता मुन्नी ला हक्काचे घर मिळाले. मला वाटले.
सासरी जाताना मला म्हणाली, "पमुतई येणार ना मला भेटायला परत?  मी तिचा हात हातात घेतला.
मग मी हि  पुढच्याच वर्षी शिक्षणा साठी बाहेर गावी निघून गेले. मुन्नीची आठवण सारखी अधून मधून येत राहीली ..
पण प्रत्यक्ष भेट मात्र होऊ शकली नाही.


काळाच्या ओघात खूप नाती अंधुक  होऊन जातात...पण ती खोल असतात कुठे तरी...आणि माहित असतं कि हवी तेंव्हा ती नाती जिवंत करू शकतो आपण..
पण अशा नात्यांचा जेंव्हा मृत्यू च होतो तेंव्हा? ...तेंव्हा काय करायचं?


कंडक्टर च्या  आवाजाने पमा ला भान आले.  


मे महिन्यातले रखरखीत ऊन...मातीचा धुराळा उडवत  एस. टी. बस खामगावला येऊन पोचली. माशा घोंघावत असलेले आणि धुळीने माखलेले खाद्य पदार्थ घेतलेली मुले एकच गलका करू लागली. पमा   नी सुटकेस काढली आणि पर्स खांद्याला लटकावून ती उतरायच्या तयारीला लागली.
bus stand वर उतरताच तिला ओळखीच्या जागा दिसू लागल्या..कोपऱ्यातले छोटेसे पुस्तकाचे दुकान, पानवाल्याची टपरी..अर्थात  जुनी पिढी जाऊन  आता नवी पिढी ठाण मारून बसली होती.  ती देशपांडे गल्ली च्या दिशेने चालू लागली. लहानपणीच्या  एक एक खुणा उलगडू लागल्या नज़रे समोर.
...............काय पमा ताई ..किती वर्षांनी..मागून आवाज आला. आपल्या ला कोणीतरी अजून इथे ओळख णारे आहे ह्याचे पमा ला आश्चर्य वाटले .
कुलकर्ण्यांचा मनोज मागून येऊन तिच्या बरोबर चालू लागला.  सुटलेले पोट , डोक्यवरचे विरळ होत चाललेले केस...चाळीशी त्याच्या सर्वांगावर पसरली होती.
इतक्या दिवसांनी गावची आठवण आली? मनोज म्हणाला..
आठवण तर कायमचीच आहे.. आज यायलाच लागलं.
तिला वाटलं, एवढं  छोटस गाव असून ह्याच्या पर्यंत बातमी कशी काय  पोहोचली  नाही ?
तिने काही बोलायचे टाळले व ती भर भर चालू लागली.
गल्लीच्या टोकाशी आली तेंव्हा तिला तिचा जुना वाडा दिसला . कोण राहतेय तिथे आता? तिला एकदा वाटले जावे अन बघावे.
पण ह्या क्षणी अजून कुठल्याही जुन्या आठवणी   नकोत..असा विचार करून ती पुढे निघाली.
वाड्या ची पडझड तिच्या नजरेतून सुटली नाही..अगदी मोडकळी ला आला होता वाडा.  अर्थात बाकी ...सगळं जसच्या तसं..फक्त खूप थकलेलं..
ती लोंढे वाड्या कडे निघाली. मुन्नी च्या सासरी.
दारातून आत जाताच तिला जाणवले कि सगळ्या घरावर एक दाट सावली पसरलीये ..दुखा: ची  ..
आत येताच तिला राधा भेटली. तिची मैत्रीण.  तिने काही न बोलता पमा ला आत नेलं.
चुळ बुळी मुन्नी शांत पहुडली होती. का केलं असेल तिने असं? आपण ओळखत होतो ना  मुन्नी ला? असं काही करेल अशी नव्हतीच ती..
का आपण तिला कधी आतून जाणलेच नाही? तिचं मन कधी उमगलं होतं का आपल्याला?
तिला काही दुखः होते तर तिने आपल्याला हाक का नाही दिली? का दिली ही असेल पण आपल्यालाच  ऐकू नाही आली?  एवढे गढून गेलो होतो आपण आपल्या
नव्या आयुष्यात?  पमाला प्रश्नच प्रश्न पडू लागले.   तिचे  डोके बधीर झाले अन  भिंतीचा आधार घेत ती टेकली.




**** चला , मुन्नी  ला न्यायला हवे आता. कोणीतरी मागून म्हणाले..


इतक्या वेळ अडवून ठेवलेल्या अश्रुना पमा नि मोकळी वाट करून दिली.


निघताना वाड्याच्या दारात येताच, "पमुतई येणार ना मला भेटायला परत? असं कोणी तरी म्हटल्याचा भास तिला झाला.


परतीच्या वाटेवर पमाला  वाटलं, "आज... संपल आपलं बालपण खऱ्या अर्थाने! 


Sharmila Ranade

----------------------------------------------------------------------------------------------------------------------



पु. ल. प्रेम

"गच्चीसह---झालीच पाहिजे" ह्या लेखातील एक मजेदार प्रसंग

मेंढे पाटलांच्या बंगल्यात दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशियन कुत्र्याने शिष्टमंडळाचे भरगच्च

स्वागत केले. प्रथम द्वारकानाथ गुप्त्यांच्या कोटाची चव त्याने घेऊन पाहिली, त्यानंतर

सोकरजींना पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिले आणि बाबा बर्व्याचा पंचा ओढला.

(
बाबांचा पंच्यापासून काचा सुटला, पण कमरेपासून पंचा सुटला नाही!!) काही वेळाने
 एक

गुरखावजा भय्या अगर भय्यावजा गुरखा घावत आला आणि त्याने नुसत्या "अबे

टायगर--" एवढ्या दिन शब्दांनी त्या भयानक जनावराला लोळण घ्यायला लावली.

भय्याच्या (अगर गुरख्याच्या) थाटावरून हेच मेंढे पाटील अशी सोकरजी त्रिलोकेकरांची
 समजूत

झाली आणि त्यांनी त्याला गुड मॉर्निंग केले. मेंढे पाटलांच्या 'आश्वासनाच्या सभे'

सोकाजीराव हजर नव्हते. गुप्ते एक डोळा कुत्र्यावर व दुसरा गुरख्यावर ठेवून होते.
 शेवटी

बाबांनी तोंड उघडले,

"
नमस्ते---"

"
क्या हे?" गुरखा.

"
हम बटाट्याची चाळकी ओरसे शिष्टमंडळ के नाते श्रीमान मेंढे पाटीलजी के दर्शनके
 लिये आये है--" आचार्य.

"
हम सोकाजी त्रिलोकेकर ओर बाबा बर्वे आचार्य होएंगा--" त्रिलोकेकरांनी हिंदीची चिंधी केली.

"
जरा थांबा हं--" आचार्य बाबांनी त्यांना आवरले, "हमारी प्रार्थना है कि श्रीमान मेंढे
 पाटील हमें दर्शन देनेकी कृपा करेंगे!"

"
हम करेंगे या मरेंगे--" गुप्ते उगाच ओरडला.

"
गुप्तेसाहेब, जरा--" बाबांनी त्यांना थांबवीत म्हटले, "जनताकी मांग हम श्रीमानजी के
 प्रती निवेदन करने का स्वप्न-स्वप्न-

"
हमारे ऊर मे बाळगते है!" त्रिलोकेकरांनी दुसरी चिंधी फाडली.

इतक्या सभांषणानतंरही गुरख्याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही.काय आहे राव,
निट सांगा की--" गुरख्याच्या (अगर भय्याच्या) तोंडून अस्खलीत मराठी ऎकुन 
पाद्याने अथर्वशीर्ष म्हटल्याच्या धक्का तिघांनाही बसला,

"
माफ करा हं. मला वाटलं, आपण गुरखे आहा--

"
किंवा भय्ये!"